अभिजीत दिपकेंचा केला जातोय छळ? सीजेपीच्या थेट दाव्याने खळबळ, पोलिसांनी पकडून….आरोप काय?
अभिजीत दिपकेंचा छळ केला जात असल्याचा आरोप सीजेपीच्या अजिंक्य शिंदे यांनी केला आहे. सीजेपीच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपी आंदोलनाचा नारा दिला होत. पंरतु जंतरमंतर जाऊन आंदोलन करण्याआधी दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यासहित शेकडो सीजेपी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दिल्ली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु तिघांना नेमकं कुठे ठेवलं, याची माहिती देण्यात आलेली नाही.
अभिजीत दिपके यांची आजी सावित्रीबाई यांचं निधन झालं. परंतु अद्याप त्यांना दिपकेंना माहिती देण्यात आलेलं नाही, असा दावा सीजेपीच्या अजिक्य शिंदे यांनी केला आहे.
सीजेपीचे अंजिक्य शिंदे यांनी म्हटलं की, अभिजीत दिपकेंवर इमोशनल अत्याचार सुरू आहे. दिपकेंच्या आजीचं निधन झालंय. त्यानंतरही पोलिसांकडून त्यांना यांच्या वकील आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
'दिपकेंवर पोलीस हे इमोशनल अत्याचार करत आहे. विमानातून त्यांना ताब्यात घेतलंय. तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आलंय. आम्हाला त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.