Tips And Trick: कॉफी पावडरचा वापर करून साफ करा भांडी! ट्राय करा व्हायरल हॅक

परदेशात लोकप्रिय असलेला हा 'व्हायरल हॅक' वापरून पहा. या हॅकमध्ये कॉफी पावडरचा वापर करून जळलेली आणि चिकट झालेली भांडी पुन्हा चकाचक करता येतात.

| Updated on: Nov 26, 2026 | 3:57 PM
1 / 5
सकाळी कॉफीशिवाय अनेकांची सुरुवात होत नाही. पण याच कॉफीचा वापर करून तुम्ही भांडी पण घासू शकता. कॅनडा आणि अमेरिकेत हा हॅक व्हायरल झाला आहे. परदेशात लोकप्रिय असलेला हा 'व्हायरल हॅक' वापरून तुम्हीही भांडी चकाकीत कटू शकता.

सकाळी कॉफीशिवाय अनेकांची सुरुवात होत नाही. पण याच कॉफीचा वापर करून तुम्ही भांडी पण घासू शकता. कॅनडा आणि अमेरिकेत हा हॅक व्हायरल झाला आहे. परदेशात लोकप्रिय असलेला हा 'व्हायरल हॅक' वापरून तुम्हीही भांडी चकाकीत कटू शकता.

2 / 5

कॉफी पावडरमध्ये छोटे-छोटे दाणे असतात. हे दाणे कडक असतात. हे दाणे घासल्याने भांड्याचा चिपचिपपणा सहज निघू शकतो. यासोबत डिशवॉशिंग लिक्विड तेल आणि ग्रीसही साफ करण्यास मदत करते.

3 / 5

हे तयार करण्यासाठी, एका लहान वाटीत २ मोठे चमचे वापरलेला कॉफीचा चोथा घ्या. त्यात डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा. जर मिश्रण खूप कोरडे वाटत असेल, तर तुम्ही त्यात थोडे कोमट पाणी घालू शकता. पेस्ट खूप पातळ किंवा खूप कोरडी होणार नाही याची खात्री करा.

4 / 5

कॉफी खरखरीत असते, त्यामुळे तो काही पृष्ठभागांवर घासल्यास त्यावर ओरखडे पडू शकतात. म्हणूनच, हे मिश्रण सर्व प्रकारच्या स्वयंपाकाच्या भांड्यांवर किंवा पृष्ठभागांवर वापरू नये. टेफ्लॉन किंवा नॉन-स्टिक भांडी, पॉलिश केलेले ॲल्युमिनियमचे साहित्य किंवा नॉन-स्टिक सिरॅमिक भांड्यांवर याचा वापर टाळावा.

5 / 5

सर्वात आधी, तयार केलेली पेस्ट घाणेरड्या भांड्यावर लावा. त्यानंतर, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या सामान्य स्पंजच्या साहाय्याने, गोलाकार हालचाली करत हलक्या हाताने घासा. खूप जास्त जोर लावण्याची गरज नाही. जेव्हा तेल निघू लागतील, तेव्हा भांडे स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या. भांड्यावर कॉफीचा कोणताही अंश शिल्लक राहणार नाही, याची खात्री करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us