
तुमच्या फोनमध्ये असलेला डेटा तुमच्यासाठी खूप अडचणीचा ठरू शकतो. तुमच्या फोनमध्ये असलेला डेटा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यामुळेच फोन वापरताना कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवे, काय काळजी घ्यायला पाहिजे याची माहिती असणे फार गरजेचे आहे.

तुमच्या फोनमध्ये बेकायदेशीर डिजिटल कन्टेंट सापडला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आक्षेपार्ह फोटो, लहान मुलांशी निगडीत अश्लील कन्टेंट, अवैध शस्त्रांची माहिती, ड्रग्स खरेदी-विक्री याविषयी माहिती तुमच्या फोनमध्ये आढळल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

तसेच तुमच्या फोनमध्ये खोटी कागदपत्रे, हँकिंग टुल्स सापडल्यास कोणत्याही तक्रारीविना तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळेच कोणताही कन्टेंट डाऊनलोड करण्याआधी, सेव्ह करण्याआधी हजार वेळा विचार करायला हवा. तुम्ही केलेल्या एका क्लिकमुळे तुम्ही थेट आरोपी होऊशकता.

पोलीस आजकाल फक्त तुमची गॅलरीच नव्हे तर क्लाऊड स्टोअरेज, गुगल ड्राईव्ह स्टोअरेजमधील डिलीट केलेला डेटाशुद्धा शोधून काढतात. त्यामुळेच कोणतेही कन्टेंट डिलीट करताना, डाऊनलोड करताना विचार करावा. भविष्यात अडचणीत न येण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

कोणतेही अॅप डाऊनलोड करताना चौकशी करा. कोणत्याही आक्षेपार्ह ग्रुपमध्ये अॅड होऊ नका. संशय वाढवणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच आक्षेपार्ह, अश्लिल कन्टेंटपासून दूर राहणे असे काही पर्याय आहेत, ज्यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणीपासून दूर राहता येते.