Ganesh Chaturthi 2026: सीएम फडणवीस यांच्या वर्षावर बाप्पा आले, सजावट नेमकी कशी? रुप साजिरे पाहिले का?
Cm Devendra fadanvis Varsha Bunglow Ganesh Chaturthi Photos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानीही बाप्पाचं आगमन झालं आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्ताने सर्वत्र गणरायांचे आगमन सुरु आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणेश चतुर्थीनिमित्त भक्तिमय वातावरणात श्री गणरायाचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही सजावट खूपच सुंदर आणि आकर्षक केलेली आहे.
दरम्यान, बाप्पाच्या आगमनाच्या या मंगलमयी प्रसंगी फडणवीस कुटुंबियांच्या पारंपरिक लूकनेही सर्वांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन हे फोटो पोस्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी दिविजा यांचे पूजेदरम्यानचे खास फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसंत केले जात आहेत.
गणेश चतुर्थीच्या या पूजेचे आणि कौटुंबिक क्षणांचे फोटो व्हायरल झाले असून नेटकऱ्यांकडून त्यांना भरभरून पसंती मिळत आहे.
दरवर्षाप्रमाणे यंदाही फडणवीस कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात बाप्पाची स्थापना व पूजा-अर्चा केली. दरम्यान, वर्षा बंगल्यावरील बाप्पाचे लोभस रूप पाहून नेटकरी हरवून गेले आहेत.