मेहेंदी लावल्यानंतर रंगच येत नाही! जाणून घ्या काही नैसर्गिक उपाय

लग्न, सण, पूजा किंवा कोणताही कार्यक्रम असल्यास महिलांना मेहेंदी काढायला प्रचंड आवडते. आता तर इंटरनेटवर मेहेंदीच्या अनेक डिझाईन्स देखील उपलब्ध आहेत. पण एवढी मेहेंदी काढल्यानंतर रंगच आला नाही तर, वाईट वाटतं. पण काही घरगुती उपायांनी तुमच्या मेहेंदीला अधिक गडद रंग येऊ शकतो. ज्यामुळे तुमची मेहेंदी देखील सुंदर दिसेल. मेंदीला गडद लाल रंग देण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहेत जे तुम्ही घरीच करून पाहू शकता.

| Updated on: Mar 21, 2026 | 2:46 PM
1 / 5
अनेक महिलांना मेहेंदी लावायला प्रचंड आवडतं. पण अनेत महिलांची अशी तक्रार असते की, हातावर मेहेंदी लावण्यानंतर रंगच येत नाही... तर मेहेंदीचा रंग अधिक गडद करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय...

2 / 5
मेहेंदी लावण्यापूर्वी हातांना थोडे निलगिरीचे तेल लावणे चांगले. यामुळे  मेहेंदीमधील घटक त्वचेत खोलवर जाण्यास मदत होईल. एकदा मेहेंदी सुकायला लागली की, एका पातेल्यात काही लवंग गरम करा आणि रंग अधिक गडद करण्यासाठी त्याचा धूर हातांना घ्या

3 / 5
मेहंदी लावल्यानंतर, ती सुकायला लागल्यावर, कापसाच्या बोळ्याने डिझाइनवर लिंबाचा रस आणि साखरेचे मिश्रण लावा. यामुळे मेहंदी त्वचेवर जास्त काळ टिकून राहण्यास आणि रंग अधिक गडद मदत होईल.

4 / 5
 मेहंदी लावल्यानंतर किमान 10 - 20 तास पाण्यात हात टाकू नका. रात्री मेहंदी लावणे आणि सकाळी धुवून टाकणे उत्तम असते. मेहंदी काढल्यानंतर हातांना मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल लावल्यास रंग अधिक गडद होण्यास मदत होईल. मेहेंदी लावल्यानंतर लगेच साबणाने हात धुणे टाळा.

5 / 5
 जे लोक केसांना मेंदी लावतात, ते गडद बरगंडी रंग मिळवण्यासाठी चहाच्या पाण्याऐवजी मिश्रणात थोडे बीटचा रस घालू शकतात. यामुळे केसांना नैसर्गिक चमक आणि रंग मिळतो.

Follow Us