
आपल्या चित्र-विचित्र पोषाखामुळे सतत चर्चेचा विषय असलेली अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फी आपल्या ड्रेसमुळं नव्हे तर हेअर स्टाईल चर्चेत आली आहेत.

उर्फीने यावेळीआपल्या केसांची हेअर स्टाईल करताना केसांना सर्वाधिक पिना लावलेल्या दिसून आल्या आहेत. तिच्या या विचित्र हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये उर्फीने व्हाईट रंगाचा क्रॉप टॉप व काळ्या रंगाची ब्रा व डेनिम जीन्स घातली आहे. यापूर्वीही उर्फीने सेफ्टी पिनच्या मदतीने टॉपची निर्मिती केली होती.

सर्वात धक्कदायक म्हणजे या चित्रविचित्र हेअर स्टाईलसह ती एअरपोर्टवर आढळून आली आहे. उर्फीने हेअरस्टाईलवर बघण्यासाठी राइट क्लिक करा. असे कॅप्शन तिने या फोटोना दिले आहे.

उर्फीच्या या फोटोवर चाहत्यांनी अत्यंत मजेशीर कमेंट केल्या आहे . एका युझरने या हेअर स्टाईलसाठी ७२ पिनाचा वापर केला असल्याचे म्हटले आहे. अमेझिंग लूक अशी कॅप्शन ही एका चाहत्याने दिली आहे.