
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर बुलढाण्याच्या मलकापूर येथील काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांनी थेट नोटांचा वर्षाव केला.

अतिक जवारीवाले यांनी जल्लोषाच्या भरात हवेत नोटा उधळल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.. विशेष म्हणजे हा व्हिडीओ केवळ टीकेचा विषय ठरत नसून, त्यांच्या अनेक समर्थकांनी तो अभिमानाने व्हॉट्सअॅप स्टेटसवरही ठेवला आहे ..

मात्र या दृश्यामुळे विजय साजरा करण्याची पद्धत आणि सार्वजनिक पदाची जबाबदारी यावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे..

विजय मिरवणूक जल्लोषात अतिक जवारीवाले यांनी नोटांची गड्डी काढून एकदा नव्हे तर तीन-चार वेळा हवेत नोटा उधळल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला..

शिवाय त्यांच्या समर्थकांकडून ही नोटा उधळताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे .. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर फिरत असून चर्चेचा विषय ठरत आहे.काहींना हा प्रसंग उत्स्फूर्त आनंदाचा भाग वाटतो, तर अनेकांना तो सार्वजनिक पदाच्या प्रतिष्ठेशी विसंगत वाटत आहे...