
कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल बोंड अळीने आक्रमण केल्याने बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

कृषी विभागाने बोंड अळी वरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रल्हाद दुतोंडे या बोरीअडगाव येथील शेतकऱ्यानं साडेतीन एकरवर कपाशीची लागवड केली होती.

पाच सहा वेळा फवारणी करुनही बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी झाला नाही.

संग्रहीत छायाचित्र

यवतमाळमध्येही कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.

वरुण ठाकरे या युवा शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीच्या पिकावर बोंड अळीने आक्रमण केले आणि कपाशीचे पीक काढणीच्या वेळी मातीमोल झाले.