केवळ 6-7 ग्रॅम सोन्यात तयार करा ही लाईटव्हेट मंगळसूत्र, पाहा डिझाईन…
तुम्ही सणासुदीसाठी किंवा करवा चौथसाठी नवीन सोन्याचे मंगळसूत्र बनवण्याचा विचार करत असाल, तर खालील डिझाइन्सनी तुम्ही पैसे वाचवू शकता. हे डिझाईन खूप हलक्या आणि साध्या डिझाइन्सच्या आहेत. ही मंगळसूत्रे अगदी कमी बजेटमध्ये तयार होतात.हे पॅटर्न्स आजकाल लोकप्रिय आहेत, कारण ते स्टायलिश आणि आधुनिक आहेत.

मंगळसूत्र एक पारंपरिक दागिना असून प्रत्येक विवाहित महिलांसाठी त्याचे महत्व जास्त आहे. मात्र, काळानुसार या मंगळसूत्राच्या डिझाईनमध्ये फरक होत आहे.आता महिला खूपच हलक्या नाजूक डिझाईनच्या मंगळसुत्रांना पसंद करतात. गोल्ड चेनमध्ये काळे मोती आणि छोटे पेंडेटवाले मंगळसूत्र खूपच एलिगेंट लूक देतात. जर करवाचौथसाठी किंवा सणासुदीसाठी गोल्ड मंगळसूत्र तयार करण्याचा विचार करत असाल तर या डिझाईन सेव्ह करु शकता. (All Images Credit- Pinterest)
एलिगेंट दिसेल हे डिझाईन - लाईटव्हेट आणि मॉडर्न टचवाले मंगळसूत्र बनवू इच्छीत असाल तर ही डिझाईन सेव्ह करु शकता. हे डिझाईन खुपच एलिगेंट लूक देणारे आहे. याचे पेडेंट देखील क्लासी असून त्यात स्टोन वर्कचे सुंदर काम आहे. तुम्ही ऑफीस जात असाल तर या प्रकारचे मंगळसूत्र तुमच्या फॉर्मल विअरवर देखील चालेल.
नावाचे अद्याक्षर असलेले डिझाईन - तुमच्या पतीच्या नावाचे पहिले अक्षर मंगळसूत्राच्या पेंडेंटवर खुपच सुंदर आणि अर्थपूर्ण दिसेल. यावर इन्फिनिटीचे साईन देखील कायमस्वरुपी नात्याचे प्रतिक मानले जाते. हलक्या वजनाचे मंगळसूत्र तुम्ही डेली विअरसाठी देखील परिधान करु शकता.
सुंदर स्टोन वर्कचे डिझाईन - पेंडेंट थोडे हेव्ही आणि डिझायनर हवे असेल तर या प्रकारचे मंगळसूत्र तयार करु शकता. हे लाईटवेट असून आणि सुट- साडीवर खूपच सुंदर दिसेल. यात सोन्यासोबत स्टोन वर्कचे सुंदर कारागिरी असल्याने ते दिसायला खूपच एलिगेंट्स आहे. गोल्ड चेनमुळे ते खूप मजबूतही आहे.
लीफवाले एलिगेंट पेंडेंट - लीफ शेपमध्ये सुंदर स्टोन वर्कसोबत हे मंगळसूत्र खूप एलिगेंट लुक देते. हे थोडे हेव्ही लूक देखील देते. यामुळे सणासुदीत आणि खास क्षणांच्या वेळी हे परिधान करण्यासाठी बेस्ट आहे. पातळी गोल्ड चेनसोबत काळ्या मोत्यांचा वापर खुपच सुंदर दिसतो.
लाईटव्हेटमध्ये सेव्ह करा ही मिनिमल डिझाईन - जर तुम्ही एकदमच मिनिमल डिझाईन पसंद असेल तर हा पॅटर्न तुमच्यासाठी आहे. ऑफीस जात असाल तर सिंपल आणि सोबर डिझाईन शोधत असाल तर हे बेस्ट आहे. हे खूप लाईटवेट मंगळसूत्र कमी बजेटमध्ये बनेल.
फ्लोरल पेंडेंट वाले डिझाईन- फ्लोरल पेंडेंट गळ्यात सुंदर दिसते. या प्रकारचे मंगळसूत्र डेली विअरसाठी परफेक्ट असले. तसेच कुठे जायचे असेल तर तुम्ही हे परिधान करु शकता. करवाचौथला देखील हे सुंदर दिसेल.
काळे मोती असलेले सुंदर पेंडेंट - काळे मोत्याची चेनसोबत हे फ्लोरल आणि गोल्ड वाले हे पेंडेट दिसायला खूपच सुंदर दिसते. खूपच लाईटवेट आणि कमी बजेटमध्ये हे तयार होते. जर तुम्ही रोज परिधान करण्यासाठी मंगळसूत्र बनवत असाल तर ही डिझाईन सेव्ह करुन ठेवा. मिनिमल ज्वेलरी पसंद करणाऱ्यांसाठी ही डिझाईन चांगली आहे.