
अर्जेंटीना स्टार फुटबॉलर लियोनल मेस्सी 'GOAT इंडिया टूर 2025'अंतर्गत तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. त्याच्या दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथून झाली. त्यानंतर तो हैदराबादला पोहचला. आणि दौऱ्याचा दुसऱ्या दिवशी तो मुंबईत आला. यावेळी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर एका खास समारंभाचे आयोजन केले होते. त्यात मेस्सीला भेटायला दिग्गज खेळाडू आणि बॉलीवूडचे तारेही जमले होते. (PHOTO CREDIT- PTI)

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये फुटबॉलचा गॉड म्हटला जाणारा लियोनल मेस्सी यांनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची भेट घेतली, यावेळी संपूर्ण मॅच सचिन - मेस्सी यांचे नाव मैदानात गाजत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. (PHOTO CREDIT- screenshot/sonyliv)

सचिन तेंडुलकर याने लियोनल मेस्सी याला गिफ्ट म्हणून सही केलेली जर्सी भेट दिली होती. दुसरीकडे लियोनल मेस्सी याने देखील तेंडुलकर याला गिफ्टमध्ये फुटबॉल देऊन प्रत्येकाचे हृदय जिंकले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. (PHOTO CREDIT- screenshot/sonyliv)

भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंह याने देखील लियोनल मेस्सी याची भेट घेतली. त्याची पत्नी मॉडेल गीता बसरा देखील या सोहळ्यात हजर होती. हरभजन याने लियोनल मेस्सी सोबतचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. हरभजनला लियोनल मेस्सी याने त्याची सही असलेली जर्सी भेट दिली. (PHOTO CREDIT- Instagram)

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लियोनेल मेस्सी याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री देखील यावेळी मेस्सी याला भेटायला पोहचला. त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि एकमेकांशी चर्चाही केली. (PHOTO CREDIT- screenshot/sonyliv)