
1200 मेट्रिक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादित होते, रुग्णांसाठी तब्बल 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरतो.

पंतप्रधान मोदींना पत्र लिहणार, इतर राज्यातून हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्याची परवानगी द्या!

जीएसटी परताव्यासाठी अधिकची मुदतवाढ द्या, पंतप्रधानांना विनंती करणार!

गेल्या वर्षी जी आरोग्यव्यवस्था वाढवली, ती आझ तोकडी पडताना दिसत आहे.

ऑक्सिजन कमी पडतोय, बेड्स कमी पडताहेत, औषधं कमी पडत आहेत. आपण सगळं वाढवू.

ही उणीदुणी काढायची वेळ नाही. उणीदुणी काढत बसलो तर महाराष्ट्र कधीही माफ नाही करणार!

राज्यातील निर्बंधात वाढ करावी लागणार, हे निर्बंध उद्या 8 वाजल्यापासून लागू होणार

उद्या संध्याकाळपासून राज्यात 15 दिवस संचारबंदी लागू

14 एप्रिल 2021 पासून राज्यात 15 दिवस कलम 144 म्हणजेच संचारबंदी लागू

पंतप्रधानांना विनंती केली, सगळ्यांना सांगा राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊ.

सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा चालू राहतील

आवश्यक सेवा सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहिल.

रस्त्यावरील छोटी दुकाने सुरु राहणार, मात्र पार्सल सुविधेचीच परवानगी

दारिद्ररेषेखालील जनतेला 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ. शिव भोजन थाळी मोफत देणार.