
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड्र ट्र्म्प यांचा सोने आणि चांदीबाबत मोठा निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. त्याची कुणकुण सराफा बाजाराला लागली. त्यामुळे सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली आहे जळगाव सराफा बाजारात दोन्ही धातु वधारले आहेत.

जळगावच्या सराफ सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात एकाच दिवसात १२०० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात सुद्धा एक हजार रूपयांची वाढ झाली आहे

सोन्याच्या दरात जळगाव सराफा बाजारात एकाच दिवसात तोळ्यामागे १२०० रुपयांनी वाढ झाली. जळगावात सोने १२०० रुपयांनी महागून जीएसटीसह ८९ हजार ५०७ रुपयांवर पोहचले.

चांदीही एक हजार रुपये महागली असून ९७,००० रुपये किलो झाली आहे. सोन्याचे दर पुन्हा 90 हजारांच्या तर चांदी 1 लाखांचे उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील.