
राष्ट्रकुल 2022 च्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिले पदक जिंकले. हे पदक वेटलिफ्टर संकेत सरगरने जिंकले, यात 55 किलो गटात 248 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले.

संकेत महादेव सरगरचे सुवर्णपदक अवघ्या एक किलोने हुकले. क्लीन अँड जर्कमध्ये दुसऱ्या प्रयत्नात सरगर जखमी झाला. त्याच्या उजव्या हाताला कोपराला दुखापत झाली. असे असतानाही मात्र त्याने सुवर्ण जिंकण्याचा तिसरा प्रयत्न केला.

संकेतने शेवटच्या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण कोपरा दुखत असल्याने तो करू शकला नाही. तो वेदनेने जागा झाला. संकेतच्या या प्रयत्नानंतर समालोचकांनी तर हा खेळाडू आपल्या कारकिर्दीशी खेळल्याचं म्हटले आहे

पदक सोहळ्यातही संकेत जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना होत असल्याची जाणीव दिसत होती. त्यांच्य उजव्या हाताला पट्टी बांधण्यात आली होती. चेहऱ्यावर निराशा आणि वेदना दोन्ही दिसत होती.

मलेशियाच्या मोहम्मद अनिक कासदानने53 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या खेळाडूने क्लीन अँड जर्कमध्ये शेवटच्या प्रयत्नात 142 किलो वजन उचलले आणि स्नॅचसह त्याचा स्कोअर 249 किलोपर्यंत पोहोचला. अशा स्थितीत संकेतला अवघ्या एक किलोने सुवर्ण पदक गमवावे लागले.