AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

D-Mart ला यंदा 742 कोटींचा नफा, उत्पन्नात मोठी उसळी; रिपोर्ट समोर येताच कळलं इतकं काय खरेदी करतात लोक

D-Mart ही ग्राहकांच्या दैनंदिन गरजांच्या वस्तूंसाठी लोकप्रिय असलेली रिटेल चेन आहे. कंपनीच्या ताज्या आर्थिक अहवालातील आकडेवारीमुळे तिच्या व्यवसायाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कंपनीच्या उत्पन्नात आणि नफ्यात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

| Updated on: Oct 17, 2026 | 9:06 AM
Share
Avenue Supermarts Ltd. या कंपनीने आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत 742.98 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 684.85 कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक तुलनेत कंपनीच्या नफ्यात 8.5% वाढ झाली आहे.

1 / 5
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीचा ऑपरेटिंग महसूल 17.8% वाढून 19,644 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच काळात हा महसूल 16,676.30 कोटी रुपये होता. कंपनीचा एकूण खर्चही वाढून 18,632.70 कोटी रुपयांवर गेला आहे.

2 / 5
एप्रिल ते सप्टेंबर 2026 या पहिल्या सहामाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 38,477.85 कोटी रुपये झाल्याचे सांगितले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 16.47% वाढ नोंदवण्यात आली आहे. या आकडेवारीतून कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार दिसून येतो.

3 / 5
राधाकिशन दमानी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रवर्तित या कंपनीचे स्टोअर्स अनेक राज्यांत आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू आणि इतर बाजारपेठांमध्ये कंपनीचा व्यवसाय आहे. दिलेल्या अहवालानुसार, शुक्रवारी कंपनीचा शेअर 3,521 रुपयांवर बंद झाला होता.

4 / 5
D-Mart मध्ये किराणा, खाद्यपदार्थ, स्वच्छतेच्या वस्तू आणि वैयक्तिक वापराच्या अनेक वस्तू मिळतात. सगळ्याच वस्तू खरेदी करण्यासाठी लोकं D-Mart मध्ये गर्दी करतात. महत्त्वाचं म्हणजे, सगळं काही चांगल्या दरात एकाच ठिकाणी घेता येतं म्हणून हे गृहिणींचं आवडतं खरेदी स्पॉट आहे. (येथे दिलेली शेअरची माहिती हे गुंतवणुकीबद्दलचे मत नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असल्याने, गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. ही माहिती रिपोर्ट्स तसेच जुन्हा अहवालांच्या आधारावर आहे)

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar : उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही चर्चा होणार?
दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल...
Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने
CM फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! अंधारे असं का म्हणाल्या?
Sushma Andhare On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
Nashik : त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी