शिक्षणमंत्र्यांच्याच जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे हाल, गुडघाभर पाण्यातून जावं लागतंय शाळेला; हेलावून टाकणारे दृश्य!

पावसामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी सरकार काळजी घेते. त्यासाठी दुर्गम भागात शाळांसाठी रस्ते, पूल यांची सोय केली जाते. परंतु खुद्द राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दाजाजी भुसे यांच्याच जिल्ह्यात पावसामुळे विद्यार्थ्यांची दशा होत असल्याचे समोर आले आहे.

| Updated on: Jul 29, 2026 | 9:29 PM
1 / 5
सध्या राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी पाऊस कोसळलतो आहे. याच पावासमुळे राज्यातील पायाभूत सविधांची दशा समोर येत आहे. काही ठिकाणी रस्ते खचून जात आहेत. तर काही ठिकाणी पूलच नसल्याने लोकांची अडचण झाली आहे.

2 / 5

पावसामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी सरकार काळजी घेते. त्यासाठी दुर्गम भागात शाळांसाठी रस्ते, पूल यांची सोय केली जाते. परंतु खुद्द राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दाजाजी भुसे यांच्याच जिल्ह्यात पावसामुळे विद्यार्थ्यांची दशा होत असल्याचे समोर आले आहे.

3 / 5

मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील इंदोरे भांगरेवाडी या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून शाळेत जाण्याची वेळ आली आहे. पालक आपल्या एका मुलाला कडेवर घेऊन इतर मुले हातात हात घेऊन कडवा नदी पार करत आहे.

4 / 5

रस्ता नसल्याने ही परिस्थिती उद्वंभवल्याचे स्थानिक सांगत आहे. मागील वर्षीही हिच परिस्थिती होती. जेंव्हा कडवा नदीला पूर येतो तेंव्हा 200 लोकवस्ती असलेल्या या आदिवासी गावाचा शहराशी संपर्क तुटतो.

5 / 5

मागील वर्षी जिल्हाधिकारी आणि उपअभियंता पंचायत समिती लघु पाट बंधारे विभाग यांना पत्र देऊनही परिस्थिती जैसे थे असल्याची तक्रार या भागातील लोकांनी केली आहे. आजही कायमस्वरूपी उपाययोजनेची ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us