
17 फेब्रुवारी रोजी सूर्य आणि चंद्रदेव शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करतील. या राशीत दोन्ही ग्रह सोबत असल्याने काही राशींच्या पुढे संकटांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊ या..

मेष राशीच्या लोकांसाठी चंद्र आणि सूर्यदेवाची युती नुकसान देणारी ठरू शकते. करिअरमध्ये परेशानी उभी राहू शकते. ऑफिसमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. वरिष्ठांसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. बोलताना काळजी घ्या. कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. गुंतवणूक करताना योग्य काळजी घ्या.

चंद्र आणि सूर्यदेवाच्या युतीमुळे कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात तणाव निर्माण होऊ शकतो. भावनिकदृष्टीकोनातून निराशाजनक स्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबात वाद होऊ शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावं. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना विचार करावा.

मकर राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावे. करिअरमध्ये प्रतिस्पर्धी वाढू शकतात. कोणाशीतरी भांडण होण्याची शक्यता आहे. जवळची व्यक्ती तुम्हाला दगा देऊ शकते. कोणतेही नवे काम करताना विचार करा. वाहन चालवताना काळजी घ्या. सतर्क राहा.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.