
घरातील प्रत्येक सामान कुठे असावे यासाठी वास्तूशास्त्रात काही नियम आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरात सुख, शांती नांदते. सोबतच घरात लक्ष्मीदेखील कायम राहते असे म्हटले जाते. परंतु अनेकदा छोट्या चुका केल्यामुळे मोठा तोटा होता. काही लोक आमच्या घरात तिजोरीत पैसेच शिल्लक राहात नाहीत, अशी तक्रार करतात. अशा लोकांनी वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तिजोरी ठेवावी. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते. त्यामुळे घरातील तिजोरी ही नेमही उत्तर दिशेलाच असावी. उत्तर दिशेला तिजोरी असेल तर तिच्यात नेहमी दाग-दागिने, पडून राहतात. तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असेल. वास्तूशास्त्रानुसार तिजोरीचा दरवाजा नेहमी पूर्वी किंवा उत्तर दिसेला असायला हवा. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

उत्तर किंवा पूर्वी दिशेला दरवाजा असेल तर ते शूभ मानले जाते. दरवाजाच्या पुढे तिजोरी कधीच ठेवू नये. ज्या खोलीत तिजोरी असते, त्या खोलीत पुरेसा प्रकाश येईल याची काळजी घ्यावी. तिजोरीच्या खोलीत प्रकाश यावा यासाठी उत्तर किंवा पूर्वी दिशेला एक छोटी खिडकी असली पाहिजे. असे केल्यास धनलाभ होतो, असे मानले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार ज्या खोलीत तुम्हाला तिजोरी ठेवायची आहे किंवा पैसे ठेवता त्या खोलीला एकच दरवाजा असायला हवा. अनेक दरवाजे असलेल्या खोलीमध्ये धन टिकत नाही, असे म्हटले जाते. तिजोरीला चुकूनही दक्षिण दिशेला ठेवू नये. ही यमाची दिशा असते. असे केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.