
वाय सेक्युरिटी असतानाही बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत. तुरुंगात बसलेल्या लॉरेन्स बिश्नोईने ही हत्या घडवून आणली आहे. लॉरेन्स बिश्नोई याच्या वडिलाबाबत बोलायचं तर त्याचे वडील हरियाणा पोलिसात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. पाच वर्षातच त्याच्या वडिलाने काम सोडलं होतं. त्यानंतर ते शेती करायला लागले. लॉरेन्सने आयपीएस अधिकारी बनावं असं त्याच्या वडिलांना वाटायचं. पण लॉरेन्स गुन्हेगारी जगतात गेला.

एकेकाळी दाऊदचं नाव घेतल्यावर अनेकांचा थरकाप व्हायचा. दाऊदचं पूर्ण नाव शेख दाऊद इब्राहीम कासकर होतं. त्याच्या वडिलाचं नाव शेख इब्राहीम अली कासकर असं होतं. तेही मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून काम करायचे.

छोटा राजन हे सुद्धा गुन्हेगारी जगतातील कुविख्यात नाव आहे. मुंबईत छोटा राजनचा मोठा दबदबा होता. मुंबईतील एका समान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणी तो सिनेमाची तिकीटे ब्लॅकने विकायचा. त्याची आई धार्मिक प्रवृत्तीची गृहिणी होती. तर वडील स्वदेशी मिलमध्ये गिरणी कामगार होते. 70च्या दशकात त्यांची नोकरी गेली. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक हालअपेष्टातून जावे लागले.

मन्या सुर्वे हे नावही गुन्हेगारी जगतात दहशत निर्माण करणारं होतं. त्याच्या नावाने भले भले थरकापायचे. मन्याचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्याचे वडील मिल कामगार होते.

गँगस्टर शहाबुद्दीनचा दिल्लीत तुरुंगात शिक्षा भोगत असताना कोरानाच्या काळात मृत्यू झाला. कॉलेजमध्ये असतानाच त्याने राजकारणात हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी त्याला हुसैनगंज पोलीस ठाण्याने हिस्ट्रीशीटर म्हणून जाहीर केलं. त्याच्या वडिलाचं नाव शेख मोहम्मद हजबुल्लाह होतं. त्याचे वडील राजकारणी होते.

श्रीप्रकाश शुक्ला हे उत्तर भारतातील गुन्हेगारी जगतातील कुविख्यात नाव होतं. त्याच्यावर 25 हत्येचे आरोप होते. गोरखपूर पासून लखनऊपर्यंत त्याची दहशत होती. 90च्या दशकात त्याची मोठी चलती होती. तो गावात पहिलवान म्हणून ओळखला जायचा. त्याचे वडील शिक्षक होते