ना मुंबई, ना बारामती, अजित पवारांच्या लेकाचा शाही विवाहसोहळा, लग्नाची पत्रिका पाहिली का?

अजित पवारांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा ४ ते ७ डिसेंबरदरम्यान बहरीनमध्ये होणार आहे. केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण असून, यात प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे.

Updated on: Dec 03, 2025 | 12:18 PM
1 / 8
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा बहरीन येथे पार पडणार आहे.

2 / 8
येत्या ४ ते ७ डिसेंबरदरम्यान जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. जय आणि ऋतुजा यांचा विवाहसोहळा मुंबई-पुण्यात नव्हे, तर परदेशात होत असल्याने वऱ्हाड निघालं बहरिनला अशी चर्चा सुरु झाली आहे.

3 / 8
या सोहळ्यासाठी पवार आणि पाटील कुटुंबियांकडून केवळ ४०० लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे.

4 / 8
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. या लग्नपत्रिकेनुसार हा विवाहसोहळा ४ दिवस अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. यात प्रत्येक दिवसासाठी एक खास थीम ठेवण्यात आली आहे.

5 / 8
लग्नपत्रिकेनुसार येत्या ४ डिसेंबर रोजी मेहंदी सोहळ्याने या समारंभाची सुरुवात होईल. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी सकाळी हळद, दुपारी वरात आणि संध्याकाळी लग्न असे तीन समारंभ असणार आहेत.

6 / 8
तर ६ डिसेंबर रोजी बीच ऑलिम्पिक्स आयोजित करण्यात येणार असून ७ डिसेंबरला स्वागत समारंभ पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. त्यामुळे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

7 / 8
ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असून त्या उद्योगपती प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. त्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी आहेत.

8 / 8
जय आणि ऋतुजा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला होता. हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मोजक्या लोकांना निमंत्रण देण्यात आले होते.