
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर पाठ थोपटली. वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आज सत्कार झाला.

रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांना राज्य शासनाने १ कोटी बक्षील म्हणून दिले. इतकंच नाहीतर टीम इंडियालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी ११ कोटी देण्याची घोषणा केली.

या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. रोहित आता टी-२० क्रिकेट खेळताना दिसणार नाही. मात्र भारतीय चाहत्यांना वाटत आहे की रोहितने अजुनही खेळायला हवं.

अजित पवार विधानसभेतील आपल्या भाषणामध्ये असं काही बोलले की जे प्रत्येक भारतीयाच्या मनातलं आहे. टी-२० क्रिकेट बघताना रोहितची आठवण आल्याशिवाय कधी गप्प बसणार नाही, असं अजित पवार बोलले.

अजित पवार बोलताना उपमुख्यमंत्री म्हणून बोलले पण त्यांचे शब्द हे प्रत्येक भारतीयाच्या मनामधील आताच्या भावना आहेत.