नंद्या अचानक सोडून गेला… अख्ख्या गावाच्या डोळ्यात पाणी, चूलही पेटली नाही; शेतातच… Photo

परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील देशमुख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नंद्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

| Updated on: Feb 20, 2026 | 2:43 PM
1 / 6
परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथे बैलगाडा शर्यतीच्या विश्वात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेला ‘नंद्या’ या बैलाच्या मृत्यूमुळे देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नंदयाच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून बैलगाडा शर्यतीच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथे बैलगाडा शर्यतीच्या विश्वात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेला ‘नंद्या’ या बैलाच्या मृत्यूमुळे देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नंदयाच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून बैलगाडा शर्यतीच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

2 / 6

नंदया हा केवळ एक शर्यतीचा बैल नव्हता तर देशमुख कुटुंबीयांसाठी तो घरातील सदस्याप्रमाणेच होता. अवघ्या काही वर्षांत त्याने बैलगाडा शर्यतीत दमदार कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

3 / 6

त्याच्या भिरभिरणाऱ्या पायांनी आणि चपळाईने अनेक शर्यतींमध्ये देशमुख कुटुंबाला यश मिळवून दिले होते. नंदयाच्या वेगवान धावण्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली होती. देशमुख कुटुंबीय नंद्याची अत्यंत प्रेमाने आणि काळजीपूर्वक निगा राखत होते.

4 / 6

त्याच्या आहारापासून ते सरावापर्यंत प्रत्येक बाबतीत विशेष लक्ष दिले जात होते. कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच त्याची देखभाल केली जात होती. त्यामुळे नंदयाचे निधन हे केवळ एका प्राण्याचे जाणे नसून कुटुंबातील जिवलग सदस्य गमावल्याची भावना देशमुख कुटुंबीयांच्या मनात आहे.

5 / 6

नंदयाचा मालक ऋषी देशमुख यांच्या कानावर नंदयाचे नाव जरी पडले तरी त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघत आहेत. तर भागवत देशमुख यांना नंद्याविषयी बोलताना हुंदका आवरत नाही. 'तो आमच्यासाठी बैल नव्हता, आमचा मुलगाच होता' असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.

6 / 6

नंद्याच्या निधनानंतर देशमुख कुटुंबीयांनी त्याच्यावर माणसांप्रमाणे अंत्यसंस्कार केले. गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून नंद्याला अखेरचा निरोप दिला. परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us