Chanakya Niti: लग्नाचा निर्णय घेताय, पण त्याआधी ‘या’ प्रश्नांची उत्तरं नक्की शोधा!
Chanakya Niti: दिवाळीनंतर आता लग्नसराईची सुरुवात होणार आहे. अशात अनेकांनी लग्नाचा निर्णय देखील घेतला असेलच. पण चाणक्य सांगतात लग्न करण्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तर नक्की शोधा... कारण लग्न चार - पाच दिवसांचा खेळ नसतो, तर आयुष्यभर एकमेकांसोबत राहायचं असतं... तर जाणून घ्या आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलं आहे.

सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार मिळणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला आपलं आयुष्य अशा व्यक्तीसोबत घालवायचं असतं, जी त्यांचा आदर करते आणि नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहते. पण चाणक्य म्हणतात की, लग्नानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टी आधीच तपासून घेणं आवश्यक आहे.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'चाणक्य नीती'मध्ये विवाहासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. भविष्यातील संघर्ष आणि गैरसमज टाळण्यासाठी लग्नाआधी आपल्या जोडीदाराला विचारण्यासारख्या ३ महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
सर्वप्रथम, जोडीदाराचे अचूक वय जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. वयातील फरक आणि पती-पत्नीमधील परस्पर अपरिपक्वतेमुळे भविष्यात नाती अनेकदा तुटतात. म्हणूनच, चाणक्य सांगतात की पती-पत्नीमध्ये वयाचा मोठा फरक नसावा.
चाणक्य आपल्याला लग्नापूर्वी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याविषयी माहिती करून घेण्याची आठवण करून देतात. भविष्यात मोठी संकटे टाळण्यासाठी, आपल्या जोडीदाराला काही गंभीर शारीरिक किंवा मानसिक आरोग्य समस्या आहेत का, हे आधीच जाणून घेणं चांगलं आहे.
चाणक्याच्या मते, साखरपुड्याच्या अगदी आधी किंवा लग्नापूर्वी, आपल्या जोडीदाराच्या भूतकाळातील संबंधांबद्दल किंवा भूतकाळाबद्दल मोकळेपणाने बोललं पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे. आपला जोडीदार आपला भूतकाळ लपवत नाही याची खात्री केली पाहिजे.