PHOTO | प्रदूषण वाढतंय… आरोग्य सांभाळण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा!

| Updated on: Oct 30, 2020 | 4:23 PM

दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातील विविध राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या समस्येनं डोकं वर काढलं आहे.

1 / 8
दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातील विविध राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या समस्येनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना हवेतील प्रदूषणामुळे श्वसनविकारांसह विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणामुळे फुफ्फुसांशी संबंधित आजार उद्भवत असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया अशा काही पदार्थांविषयची माहिती....

2 / 8
गूळ : वायू प्रदूषणापासून बचावासाठी गूळ सर्वाधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुमच्या आहारात गुळाचा समावेश करा. गुळात काही अँटीअॅलर्जिक गुणं असतात. त्यामुळे गूळ दम्याच्या रोग्यांसाठी फायदेशीर आहे. गुळात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचा स्तर सामान्य राहातो आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. गूळ खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते, त्याशिवाय, खोकला-सर्दीसारखे आजारही बरे होतात.

3 / 8
ऑलिव्ह ऑईल : ऑलिव्ह ऑईलमध्ये विटामिन-ई असतं, ज्यामुळे फुफ्फुसांची समस्या दूर होते आणि त्याचे कार्य सुधारते. ऑलिव्ह ऑईलमध्ये असणाऱ्या फॅटी अॅसिडमुळे शरीरावरील सूज कमी होते. तसेच, प्रदूषणामुळे होणाऱ्या कार्डियोव्हॅस्क्यूलर हार्ट डिसीजची समस्याही दूर होते.

4 / 8
हर्बल टी : वजन कमी करण्यापासून ते निरोगी राहण्यापर्यंत हर्बल टीचे अनेक फायदे आहेत. यामधील अँटीऑक्सिडेंट्स शरीरातील टॉक्सिंसला बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. त्याशिवाय, वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या अॅलर्जीपासूनही बचाव करते. तुम्ही घरीच तुळशी, आलं आणि लिंबूच्या रसाचा वापर करुन हर्बल-टी बनवू शकता.

5 / 8
जवस : जवसामध्ये मोठ्या प्रमाणात फाईटोईस्ट्रोजन्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. फाईटोईस्ट्रोजन्समध्ये काही अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे दमा आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या अॅलर्जीपासून सुरक्षा करतात. प्रदूषणापासून सुरक्षा करण्यासाठी जवस सर्वाधिक फायदेशीर ठरते.

6 / 8
टोमॅटो

टोमॅटो

7 / 8
पाणी : श्वासाद्वारे शरीरात पोहोचणाऱ्या विषाला बोहेर काढण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसभरात 4 लिटर पाणी प्यायला हवं. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन लेव्हल नियंत्रणात राहील.

8 / 8
खोकला, घश्यातील खवखव दूर करेल लसूण, जाणून घ्या याचे लाभदायी फायदे