खोबऱ्याची चटणी बनवण्याची स्वादिष्ट आणि पारंपारिक रेसिपी

सुट्टीच्या दिवळी नाश्टा काय करायचा असा प्रश्न पडतो. अशात इडली-डोसा, वडा किंवा उपमा या पदार्थांना अधिक प्राधान्य दिलं जातं. पण यासोबत लागते ती म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यामुळे जाणून घ्या स्वादिष्ट आणि पारंपारिक खोबऱ्याची चटणी बनवण्याची रेसिपी

Updated on: Dec 02, 2025 | 3:48 PM
1 / 5
खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी ताजा किसलेला नारळ – 1 कप, हिरव्या मिरच्या – चवीनुसार, भाजलेली चण्याची डाळ... डाळ घातली तर जास्त छान टेक्स्चर येतं...  2 टेबलस्पून,  आलं –  आर्धा इंच तुकडा, लसूण, मीठ – चवीनुसार, लिंबाचा रस किंवा चिंचेचा लहान तुकडा 1 टीस्पून घ्या... आणि पाणी आवश्यकतेनुसार घाला.

2 / 5
फोडणीसाठी लागणारं साहित्य तेल – 1 टीस्पून, मोहरी – ½ टीस्पून, उडीद डाळ – ½ टीस्पून, कडीपत्ता , सुक्या लाल मिरच्या – 1... हे साहित्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी लागेल.

3 / 5
चटणी तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये किसलेला नारळ, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण  भाजलेली चण्याची डाळ आणि मीठ घाला. त्यात थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या.

4 / 5
लिंबाचा रस किंवा चिंच घालून पुन्हा एकदा थोडं फिरवून घ्या.... यामुळे चटणीला आणखी चव येते... त्यानंतर फोडणी द्या. अनेकांनी फोडणी दिलेली चटणी आवडते.

5 / 5
चटणीला फोडणी देण्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करा. मोहरी टाकून तडतडू द्या. नंतर उडीद डाळ, कडीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या टाकून हलका गुलाबी होईपर्यंत परता. ही फोडणी तयार चटणीवर घालून नीट मिसळा. त्यानंतर चटणी खाण्यासाठी तयार होईल.