Dadar Kabutar Khana: कबुतरांना धान्य टाकण्यावर बंदी तरीही लोक ऐकेना, BMC ने आता पर्यंत वसूल केला इतका दंड

Dadar Kabutar Khana: मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या सर्वच कबुतरखान्यांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यामधील 44 कबूतर खान्यावर महापालिकेने कारवाई केल्याचे समोर आले आहे.

| Updated on: Aug 10, 2025 | 1:32 PM
1 / 5
मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबुतरखाना परिसरात पक्ष्यांना खाद्य देण्यावर निर्बंध घातले असले तरी, काही नागरिक नव्या युक्त्या वापरून कायद्याची पायमल्ली करत आहेत. यामुळे मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता कठोर पावले उचलली असून, अशा व्यक्तींवर कडक कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत, पालिकेने शहरातील एकूण ४४ कबुतरखान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना दंड आकरण्यात येत आहे. जवळपास 20 दिवसांमध्ये पालिकेने किती रुपयांचा दंड आकरला जाणून घ्या...

2 / 5
13 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत पालिकेने 142 प्रकरणे नोंदवली असून, एकूण 68,700 रुपये दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक दंड हा चर्चेत असलेल्या दादर पश्चिम भागातील कबुतरखान्यावरून गोळा करण्यात आला आहे. या ठिकाणी 51 व्यक्तींकडून 22,200 रुपये दंड वसूल झाला आहे. मुंबईच्या वार्ड व्यवस्थेनुसार, 'ए' वार्डपासून ते 'टी' वार्डपर्यंत एकूण 44 कबुतरखान्यांवर पालिकेची नजर आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पूर्व (पी पूर्व वार्ड) येथे 5 कबुतरखाने आहेत, तर मालाड पश्चिम (पी पश्चिम) येथेही 5 आहेत. के पश्चिम वार्डमध्ये 4 कबुतरखाने आहेत, आणि दक्षिण मुंबईतील 'डी' वार्डमध्ये गिरगाव चौपाटी आणि आसपासच्या भागात 4 कबुतरखाने आहेत.

4 / 5
'जी दक्षिण' वार्डमध्ये 3 कबुतरखाने आहेत. विलेपार्ले पूर्व-अंधेरी पूर्व (के पूर्व) येथे 3, तर गोरेगाव पश्चिम (पी पश्चिम) येथेही 3 कबुतरखाने आहेत. दक्षिण मुंबईतील 'ए' वार्डमध्ये 2, माटुंगा परिसरातील 'एफ उत्तर' मध्ये 2, वांद्रे-सांताक्रूझ पश्चिम (एच पश्चिम) येथे 2, बोरिवली-दहिसर (आर मध्य आणि आर उत्तर) येथे प्रत्येकी 2, आणि भांडुपमध्ये 2 कबुतरखाने आहेत. 'एफ दक्षिण', 'जी उत्तर', 'एच पूर्व', 'आर दक्षिण' आणि 'एन' वार्डमध्ये प्रत्येकी एक कबुतरखाना आहे.

5 / 5
कबुतरखाना

कबुतरखाना