
बॉलिवूड अभिनेते हे कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतात. कधी त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली तर कधी त्यांच्या अॅब्सने तरुणींची मने जिंकली. पण बॉलिवूडमधील एका बड्या खानदानातील अभिनेत्याने 23 पैकी 11 सिनेमे फ्लॉप दिले आहेत. आता हा अभिनेता कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या अभिनेत्याला चित्रपटांमधील हीरो म्हणून त्याला जास्त ओळख मिळाली नाही, पण व्हिलनच्या भूमिकेत त्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली. 'वजीर', 'गोलमाल अगेन' आणि 'साहो' सारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण केली.

आम्ही ज्या कलाकाराबद्दल बोलत आहोत, तो आहे नील नितिन मुकेश. त्याचा जन्म १५ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत झाला. त्याचे खरे नाव नील माथुर आहे, पण त्यांनी वडील आणि आजोबांचे नाव जोडून नील नितिन मुकेश असे नाव ठेवले. त्यांचे वडील नितिन मुकेश हे प्रसिद्ध गायक आहेत आणि आजोबा मुकेश हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक होते. बालपणापासूनच नीलचे कुटुंब संगीत आणि कलेशी जोडलेले होते.

'जॉनी गद्दार' चित्रपटाच्या यशानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात 'आ देखें जरा', 'न्यूयॉर्क', 'लफंगे परिंदे', 'प्लेयर्स' आणि '३जी' सारखे चित्रपट आहेत. या चित्रपटांमध्ये त्यांनी हीरोच्या भूमिकेत काम केले. पण नंतर त्याच्या करिअरमध्ये एक वळण आले आणि त्याने व्हिलनच्या भूमिका स्वीकारल्या. 'वजीर' मध्ये व्हिलनची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर 'गोलमाल अगेन' आणि 'साहो' मध्येही त्याने व्हिलनच्या भूमिकेत दमदार अभिनय केला.

नील नितिन मुकेश हा फक्त अभिनेता नाही, तर तो प्रोड्यूसरही आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, त्याने समाजसेवेतही योगदान दिले आहे. २००९ मध्ये त्याने एक एनजीओ सुरू केला, ज्याद्वारे गरजू महिलांना अन्न, राहण्याची सोय आणि प्रशिक्षण दिले जाते.

नीलच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर, अंदाजानुसार त्याची एकूण संपत्ती सुमारे ४० कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे अनेक लग्जरी घड्याळे, कार आणि इतर महागडी वस्तू आहेत, ज्या त्याने रिअल इस्टेट, व्यवसाय आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमावल्या आहेत.