
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. घरी परतल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांचे औक्षण केले.

देवेंद्र फडणवीस यांना 24 ऑक्टोबरला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. 12 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे सात दिवस ‘होम आयसोलेशन‘मध्ये राहणार आहे, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे सुप्रिटेंडेंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही दिवस होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा भाजप नेते गिरीश महाजन त्यांच्यासोबत होते.