Dhamaal 4 OTT Release: तारीख आली समोर, ओटीटीवर कधी अन् कुठे पाहू शकता ‘धमाल 4?’

Dhamaal 4 on OTT: अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जाफेद जाफरी यांच्या भूमिका असलेला 'धमाल 4' हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Aug 12, 2026 | 11:32 AM
1 / 5
2026 या वर्षात कमाईच्या दृष्टीने यशस्वी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्यात 'धमाल 4'चा उल्लेख आवर्जून करावा लागेल. अजय देवगण, रितेश देशमुख, जाफेद जाफरी यांसह इतरही अनेक कलाकारांच्या भूमिका असलेल्या या कॉमेडी चित्रपटाने थिएटरमध्ये प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.

2 / 5
'धमाल 4'च्या ओटीटी रिलीजची तारीख आणि त्यासंबंधीचे अपडेट्स समोर आले आहेत. 'धमाल 4'ने नुकतंच थिएटरमध्ये एक महिना पूर्ण केला आहे. बरोबर 30 दिवसांपूर्वी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर एखादा चित्रपट सर्वसाधारणपणे 45 ते 60 दिवसांनी ओटीटीवर येतो. 'धमाल 4'बद्दलही असाच ट्रेंड दिसून येत आहे.

3 / 5
'धमाल 4' हा चित्रपट पुढच्या महिन्यात 4 सप्टेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वीच नेटफ्लिक्सने त्याचे डिजिटल हक्क मिळवले आहेत. जर थिएटरमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल, तर काही दिवसांत तुम्ही ओटीटीवर त्याचा आनंद घेऊ शकता.

4 / 5
या चित्रपटात अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, संजिदा शेख, अंजली आनंद, संजय मिश्रा, जावेद जाफरी आणि रवी किशन यांच्या भूमिका आहेत. 'धमाल 4'ने देशभरात 150 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 237 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

5 / 5
'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे', 'जन नायकन', 'द ओडिसी' यांसारख्या चित्रपटांसोबत थिएटरमध्ये टक्कर असतानाही 'धमाल 4'ने दमदार कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 99.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us