
'बिग बॉस मराठी 5' फेम अंकिता वालावलकर ऊर्फ 'कोकण हार्टेड गर्ल' लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्रियकरासोबतचा फोटो पोस्ट करत तिने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. आता अंकिताच्या लग्नाबाबत धनंजय पोवार ऊर्फ डीपी दादाने प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉसच्या घरातील अंकिता आणि डीपी दादाची मैत्री चांगलीच गाजली होती. हे दोघं एकमेकांना बहीण-भाऊ मानतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धनंजयला अंकिताच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. "अंकिताला लग्नात आहेर काय देणार", असा प्रश्न डीपीला विचारण्यात आला होता.

यावर डीपीनेही त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं. "अंकिताला आहेर काय द्यायचा? ती दिसते तशी नाही, ती जरा आगाऊ आहे. माझ्याकडे ती सोफा, पाटी असं काहीतरी मागेल. साडी देऊन सात-आठ हजारांमध्ये भागवण्यासारखं मला वाटत नाही", असं तो म्हणाला.

"अंकिताचा भाऊ म्हणून मी तिच्या लग्नाला नक्कीच उपस्थित राहीन. लग्नात तिला आहेर म्हणून 1100 रुपयांचं पाकिट देईन", असं तो हसत पुढे म्हणतो. नंतर तो हेसुद्धा स्पष्ट करतो की, भाऊ म्हणून अंकितासाठी जे चांगलं करता येईल ते तो नक्की करेल.

अंकिता संगीत दिग्दर्शक कुणाल भगतला डेट करतेय. दोघांनी सोशल मीडियाद्वारे प्रेमाची जाहीर कबुली दिली. या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. नुकत्याच एका मुलाखतीत अंकिताने सांगितलं की, लग्नाची बातमी सर्वांत आधी तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सांगितली होती.