
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. 2020 साली दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र, लग्नाच्या दोन वर्षातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2025मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी धनश्रीने युजवेंद्रकडे 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चा होत्या. आता धनश्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

धनश्री सध्या 'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. तिने नुकताच एका भागामध्ये घटस्फोटावर बिनधास्त वक्तव्य केले. तसेच तिने 60 कोटी रुपये पोटगी घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

'राईज अँड फॉल' या शोमध्ये नयनदीप रक्षित धनश्रीला विचारतो की, जेव्हा तुझ्यावर पोटगीचा आरोप झाला, तेव्हा तुला कधी काही बोलण्याची गरज वाटली का?

धनश्रीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. "जेव्हा आपण असे काहीतरी घडताना पाहतो, तेव्हा फारच दुःख होते. ते आवश्यक नव्हते. त्यात काहीही खरं नाही. त्याने असे का केले? याचा विचार करून मला आणखी वाईट वाटले?"

पुढे धनश्री म्हणाली की, "पण काहीही झालं, तरी मी नेहमीच त्याचा आदर करिन, मी तेच मानते. आता, मला वाटत नाही की, मी पुन्हा कोणालाही डेट करू शकते..."