
'धूम' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री ईशा देओल सध्या तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

दोन मुलांची आई असून देखील ईशा देओल हिची परफेक्ट फिगर कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या ईशा देओल बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखीस फार मोठी आहे.

ईशा देओल तिच्या फिटनेसवर देखील विशेष लक्ष देते. शिवाय इतरांना देखील फिट राहण्याचं आवाहन करत असते.

'धूम' गर्ल ईशा देओल कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो.