धुळे – दुष्काळाच्या झळा, शेती वाळून गेली, काम न उरल्याने वरझडी गावातील ८० टक्के ग्रामस्थांचे स्थलांतर
महाराष्ट्रात यंदा दुष्काळाचे सावट आहे. ऑक्टोबरातच अनेक जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. सोलापूरातील भीमा नदी कोरडीठाक पडली आहे.शेती वाळून गेल्याने कोणतेही काम मिळत नसल्याने आता धुळे येथील एका गावातील ८० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे.

धुळे येथील वरझडी गावातील ८० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. शिरपूर तालुक्यातील सात पाड्यांमध्ये रोजगाराचा गंभीर प्रश्न झाला आहे.
शिरपूर तालुक्यातील सात पाड्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. मजुरीसाठी गुजरात,मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील विविध शहरांकडे धाव घेतली आहे. ६५० लोकसंख्येच्या मुख्य गावात केवळ १० कुटुंबे आता शिल्लक आहेत.
११६ पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळेत केवळ ४० ते ५० विद्यार्थी उपस्थित राहात आहेत. आई-वडीलांचे रोजगारासाठी स्थलांतर झाल्याने चिमुकल्यांच्या शिक्षणावर संकट आले आहे.
शिरपूरचा साखर कारखाना सुरू करण्यात यावी अशी मागणी खासदार गोवा पाडवी यांनी केली आहे. तसेच एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करण्यात यावे अशी मागणी खासदार गोवा पाडवी यांनी केली आहे. वरझडीत रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठा शासनाच्या निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.