AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्योजक राणा सूर्यवंशी पुण्याच्या रुग्णालयातून फरार, पोलिसांकडून शोध सुरू

मोठी बातमी समोर येत आहे. राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि व्यावसायिक राणा सूर्यवंशी हे पोलिसांच्या चौकशीपूर्वीच पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून फरार झाले आहेत.

मोठी बातमी! उद्योजक राणा सूर्यवंशी पुण्याच्या रुग्णालयातून फरार, पोलिसांकडून शोध सुरू
Rana SuryavanshiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 7:50 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि व्यावसायिक राणा सूर्यवंशी हे पोलिसांच्या चौकशीपूर्वीच पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून फरार झाले आहेत. बारामतीमध्ये सूर्यवंशी याच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या कथिक हल्ल्याप्रकरणात पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येणार होती, मात्र त्यापूर्वीच ते पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून फरार झाल्याची बातमी आता समोर आली आहे. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी राणा शिपिंग कंपनीचे मालक आणि व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात 18 ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळानजीक आपल्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची तक्रार राणा सूर्यवंशी याने बारामती पोलिसांकडे दिली होती.  या प्रकरणात कटात सहभागी असलेल्या राणा सूर्यवंशीच्या निकटवर्तीयांवर व साथीदारांवर बारामती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.  याच कथित हल्ल्याप्रकरणात राणा सूर्यवंशी यांची देखील चौकशी होणार होती, मात्र या चौकशीपूर्वीच ते फरार झाले असून, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत.

बारामती विमानतळानजीक अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार राणा सूर्यवंशी यांनी केली होती. त्यानंतर त्यांना पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलं होतं. त्यांची या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी होणार होती. परंतु पोलिसांच्या चौकशीपूर्वीच राणा सूर्यवंशी हे पुण्याच्या रुबी रुग्णालयातून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना समोर येताच पुण्यात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.

कारण अस्पष्ट 

दरम्यान राणा सूर्यवंशी हे पुण्याच्या रूबी रुग्णालयातून फरार का झाले, याचं कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. पोलीस चौकशीपूर्वीच ते फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. बारामती विमानतळ परिसरात आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत