Dhurandhar 2 : रिलीज आधीच रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ चा मोठा धमाका, पहिल्या पार्टचा रेकॉर्ड मोडला
Dhurandhar 2 Advance Booking Report : रणवीर सिंहची फिल्म 'धुरंधर 2' ज्या पद्धतीने प्री-सेल्स मध्ये परफॉर्म करतेय, त्यावरुन असं दिसतय की, हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर बंपर ओपनिंग करेल.

Dhurandhar 2 : सध्या कुठल्या चित्रपटाची सर्वात जास्त चर्चा आहे तर तो 'धुरंधर 2'. 19 मार्चला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. फॅन्स इतके उत्साहीत आहेत की, मेर्कसनी रिलीजच्या एकदिवस आधी चित्रपटाचे पेड प्रीव्यूज शोज ठेवले आहेत.

सैकनिल्कनुसार 'धुरंधर 2' पेड प्रीव्यूज शो चे आतापर्यंत 4 लाख 77 हजार 981 तिकीटांची विक्री झाली आहे. हा आकडा 13 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंतचा आहे. या चित्रपटाने रिलीज आधीच 24.46 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यात ब्लॉक सीटचा समावेश केला, तर कमाईचा आकडा 29.4 कोटी रुपयांच्या घरात जातो. म्हणजे ‘धुरंधर’ च्या पहिल्या पार्टच्या ओपनिंग डे कलेक्शनपेक्षा पण जास्त रक्कम होते. ‘धुरंधर’ ने पहिल्या दिवशी 28 कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘धुरंधर 2’ च्या पेड प्रीव्यूज शो साठी अजून 5 दिवस बाकी आहेत आणि बुकिंग सतत सुरु आहे. अशात हा चित्रपट पेड प्रीव्यूज शोज मधूनच बॉक्स ऑफिस वर मोठा धमाका करणार आहे. पेड प्रीव्यूज आणि ओपनिंग डे कलेक्शन मिळवून पहिल्यादिवशीच फिल्मचं टोटल कलेक्शन 100 कोटीच्या वर जाऊ शकतं.

असं झाल्यास ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिस वर पहिल्यादिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनेल. आतापर्यंतचा बॉलीवूडमधला सर्वाधिक कमाई करणारा ओपनर चित्रपट वर्ष 2023 मध्ये आलेला शाहरुख खानचा ‘जवान’ आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 75 कोटीची कमाई केली होती.