Madhavan : श्रीमंत लोक गोल्फ का खेळतात? त्यातून काय शिकता येतं? माधवनने सांगितला स्वत:चा अनुभव
Madhavan : धुरंधर चित्रपटातील अभिनयामुळे चर्चेत असलेल्या आर.माधवनने गोल्फ या खेळाचं महत्व सांगितलं आहे. गोल्फ या खेळाकडून काय शिकायला मिळालं? हा अनुभव त्याने शेअर केला आहे.

गोल्फ हा श्रीमंतांचा खेळ मानला जातो. अनेकदा चित्रपटात आपण इंडस्ट्रीयलिस्टचा रोल प्ले करणाऱ्या पात्राला गोल्फ खेळताना बघतो. आता आर माधवनने गोल्फ या खेळाशी असलेलं त्याचं नातं आणि अभिनेता म्हणून त्याला या खेळातून काय शिकायला मिळालं? या बद्दल तो बोलला आहे.

गोल्फमुळे मला शूटिंग दरम्यान सार्वजनिक ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्यास मदत झाली. शिस्त पाळण्यात सुद्धा गोल्फचा रोल कसा महत्वाचा ठरला, या बद्दल माधवनने सांगितलं. गोल्फमुळे मला मोकळ्या जागेत, गर्दीच्या ठिकाणी, सीन्सचं शूटिंग करणं सोपं झालं असं माधवन म्हणाला.

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये लोकांसमोर अभिनय करणं माधवनला कठीण वाटायचं. लोक हसायचे, कमेंट करायचे. वेळेबरोबर गोल्फने त्याचा दृष्टीकोन बदलला असं माधवन म्हणाला.

गोल्फ हा जगातला असा एकमेव खेळ आहे, जिथे तुम्ही दुसऱ्या कोणाशी नाही, स्वत:शी स्पर्धा करता. हा खेळ अभिनयासारखाच आहे. गोल्फरप्रमाणे अभिनेत्याला सुद्धा त्याचं लक्ष केंद्रीत करावं लागतं. बाहेरच्या अडचणींवर मात करावी लागते असं माधवन म्हणाला.

एका गोल्फर चेंडू मारण्याची जशी तयारी करतो, त्याच मानसिकतेने शूटिंग दरम्यान शांत रहायला मदत केली. गोल्फ हा खेळ टॉप सीईओ आणि अब्जाधीशांसह श्रीमंत लोकांना आकर्षित करतो. गोल्फ हा खेळ धैर्य, भावनात्मक कंट्रोल आणि दूरगामी विचार विकसित करतो. गडबड, गोंधळ नसलेल्या वातावरणात तुम्हाला हा खेळावा लागतो. तिथे एकाग्रता आवश्यक असते.