‘धुरंधर 2’मधल्या रणवीरच्या ऑनस्क्रीन आईला ओळखलंत का? ‘बॉर्डर 2’शी खास कनेक्शन
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटात जसकीरत सिंह रंगीच्या (रणवीर सिंह) आईची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? या अभिनेत्रीचं 'बॉर्डर 2'शी खास कनेक्शन आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटात जसकीरत सिंह रंगीची (रणवीर सिंह) आई प्रभनीत कौर यांची भूमिका अभिनेत्री मधुरजीत सरघीने साकारली आहे. मधुरजीत ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे.

मधुरजीतने टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत अनेक उल्लेखनीय भूमिका साकारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय आणि चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार क्वचित लोकांना माहीत असेल.

मधुरजीत सरघी ही प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग सिंहची पत्नी आहे. अनुराग सिंहने 'केसरी', 'बॉर्डर 2' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मधुरजीतनेही रंगभूमी आणि टेलिव्हिजनवर आपली विशेष छाप सोडली आहे.

मधुरजीतने तिच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली होती. विविध मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मधुरजीत आणि अनुराग यांच्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे बरेच फोटो पहायला मिळतात.

मधुरजीतने 'अग्निपथ', 'छपाक' आणि 'केसरी' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच 'फिराक', 'समर 2007' आणि 'मंटो' यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटांमध्येही तिने काम केलंय.