
चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकैतच्या रोलने सगळ्यांचं मन जिंकलं. त्याचवेळी लोकांची एक्साइटमेंट त्यावेळी सर्वात जास्त वाढली, जेव्हा रहमानच्या पत्नीच्या रोलमध्ये फेमस टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडनला पाहिलं.

चित्रपटात सौम्याची भूमिका खूपच छोटी आहे. पण ती स्टोरीचा महत्वाचा भाग आहे. तिच्या भूमिकेचं सुद्धा कौतुक होतय. या दरम्यान सौम्या तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळे सुद्धा चर्चेत आहे.

सौम्या टंडनने तिचं पर्सनल आयुष्य लाइम लाइटपासून नेहमीच लांब ठेवलं. पण अनेक ठिकाणी तिच्या लव्ह लाइफची चर्चा होते. सौम्या टंडनने वर्ष 2016 मध्ये लॉन्ग टर्म बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंह सोबत लग्न केलं.

सौम्या आणि सौरभची कॉलेजमध्ये असताना ओळख झाली होती. दोघे 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न खूप प्रायवेट पद्धतीने झालेलं. ती बोललेली सुद्धा तिला तिचं पर्सनल लाइफ लोकांमध्ये आणायचं नाही.

सौम्या टंडनचा पती सौरभ दिल्लीत लहानाचा मोठा झालाय. त्याचं शिक्षण दिल्लीत झालय. लग्नाआधी सौम्या आणि सौरभ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. सौरभ प्रोफेशनने एक बँकर असून मुंबईत राहतो. कॉलेजच्या दिवसापासूनच सौरभने मला अभिनयासाठी सपोर्ट केला. 2019 साली तिने सुंदर मुलाला जन्म दिला. ती नेहमीच सोशल मीडियावर मुलासोबतचे फोटो शेअर करत असते.