Dhurandhar: औरंगजेब की रहमान डकैत? कोणत्या रोलसाठी अक्षय खन्नाने जास्त फी घेतली? वाचा इतर कलाकारांचेही मानधन

Dhurandhar: ‘धुरंधर’मधील रहमान डकैत या भूमिकेआधी अक्षय खन्नाची ‘छावा’ सिनेमामधील औरंगजेबाची भूमिका विशेष गाजली होती. हा भूमिकेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. चला जाणून घेऊया की कोणत्या रोलसाठी अक्षय खन्नाने जास्त पैसे घेतले होते.

| Updated on: Dec 12, 2025 | 12:39 PM
1 / 6
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा अभिनयाच्या विश्वात सक्रिय झाला. त्याच्यासाठी 2025 हे वर्ष खास ठरल्याचे दिसत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने 'छावा' या चित्रपटात काम केले होते. त्याची या चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका विशेष गाजली. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्याचा धुरंधर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अक्षय खन्नाने कोणत्या भूमिकेसाठी जास्त फी घेतली जाणून घेऊया...

2 / 6
अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’ हा चित्रपट नुकताच ५ डिसेंबरला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याने रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. अक्षयची ही भूमिका सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. पण एकाच वर्षात प्रदर्शित झालेल्या या दोन चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटासाठी त्याने सर्वाधिक मानधन घेतले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

3 / 6
‘छावा’मध्ये अक्षय खन्नासोबत विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हा २०२५ सालातील भारतातील दुसरा आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने जगभरात ८०७.९१ कोटी रुपयांची कमाई केली होती. रिपोर्टनुसार, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटासाठी अक्षयला २.५ कोटी रुपये मानधन मिळाले होते.

4 / 6
रिपोर्टनुसार, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’साठी अक्षयला ३ कोटी रुपये मिळाले आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग लीड रोलमध्ये आहे. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि राकेश बेदीही झळकले आहेत. सर्व कलाकारांची चर्चा आहे, पण सर्वात जास्त अक्षयच चर्चेत आहेत. २०२३ मध्ये आलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटानंतर बॉबी देओल जसा लाइमलाइटमध्ये आला होता, तसेच आता अक्षय खन्नासोबत घडत आहे.

5 / 6
धुरंधर या चित्रपटात ‘Fa9la’ नावाचे एक बहरीनी गाणे आहे, जे लोकांना खूप आवडत आहे. चित्रपटात अक्षय या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आता त्याच्या डान्स स्टेप आणि हे गाणे व्हायरल झाले आहे. लोक यावर रील्स बनवत आहेत. ‘धुरंधर’ही चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांत जगभरात २७४.२५ कोटी रुपये कमावले आहेत.

6 / 6
या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या रणवीर सिंगने 30 कोटी मानधन घेतल्याचे बोलले जात आहे. तर संजय दत्तने 8 ते 10 कोटी, आर माधवनने 9 कोटी, अर्जुन रामपाल आणि सारा यांनी 1 कोटी मानधन घेतल्याची चर्चा सुरु आहे.