2025 चं ब्लॉकबस्टर गाणं, जे या अभिनेत्री पीरियड्समध्ये केलं शूट, कारण फक्त दोन…

प्रसिद्ध अभिनेत्रीने पीरियड्समध्ये शूट केलं गाणं. प्रदर्शित होताच ठरलं ब्लॉकबस्टर. आजही प्रेक्षक त्याच गाण्यावर धरतात ठेका. बनतायत लाखो रील्स.

| Updated on: Feb 08, 2026 | 11:42 AM
1 / 7
2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, एक असा चित्रपट थिएटरमध्ये आला ज्याने अख्ख बॉक्स ऑफिसवर डोक्यावर घेतलं. हा चित्रपट तर ब्लॉकबस्टर झालाच, मात्र, यामधील प्रत्येक गाणं सुपरहिट झालं.

2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, एक असा चित्रपट थिएटरमध्ये आला ज्याने अख्ख बॉक्स ऑफिसवर डोक्यावर घेतलं. हा चित्रपट तर ब्लॉकबस्टर झालाच, मात्र, यामधील प्रत्येक गाणं सुपरहिट झालं.

2 / 7

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे दिग्गज कलाकारही झळकले होते.

3 / 7

दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि लक्षात राहणारी गाणी यामुळे ‘धुरंधर’ने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. विशेषतः या चित्रपटातील ‘शरारत’ हे गाणे प्रचंड चर्चेत राहिले. या गाण्यात आयशा खान आणि क्रिस्टल डीसूजा यांनी धमाकेदार डान्स केला होता.

4 / 7

अशातच आता या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक खास अनुभव अभिनेत्री आयशा खानने शेअर केला आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘शरारत’ गाण्याचे शूट फक्त दोन दिवसांचे होते पण ते खूपच हेक्टिक होते. त्या वेळी मला पीरियड्स आले होते.

5 / 7

अशा काळात आपण आपल्या बेस्टमध्ये नसतो. खूप त्रास होतो, थकवा जाणवतो. कधी कधी वाटत होते की काश मी माझ्या बेस्टमध्ये असते.' हे फक्त दोन दिवसांचे शूट होते पण काम प्रचंड होते.

6 / 7

सेटवर नेमकं काय चाललंय, कोण कोण उपस्थित आहे, याची कल्पनाही आम्हाला नव्हती. इतका गोंधळ आणि घाई होती. त्या दोन दिवसांत वेडिंग सीक्वेन्सचं शूटही करायचं होतं. आमच्याकडे अजिबात वेळ नव्हता. सतत डान्स केल्यामुळे शरीर अक्षरशः दुखत होतं, हाडं ठणकत होती.

7 / 7

मी आधीच थकले होते आणि पीरियड्समुळे खूप इमोशनलही झाले होते. शेवटी मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि रडू लागले. पण ते दु:खाचे नाही तर आनंदाचे अश्रू होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us