
'धुरंधर' या चित्रपटाची फक्त कथा किंवा त्यातील कलाकारांचं अभिनयच दमदार नाही, तर त्यातील गाणीसुद्धा जबरदस्त आहेत. 'शरारत' हे गाणं सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होतंय. या गाण्यासाठी आधी तमन्ना भाटियाची निवड झाल्याची चर्चा होती. परंतु कथेवरून प्रेक्षकांचं लक्ष भरकटू नये म्हणून क्रिस्टल डिसूझा आणि आयेशा खान यांची निवड करण्यात आली.

'शरारत' या गाण्यावर अफलातून डान्स करणारी क्रिस्टल ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने सुंदर दिसण्यासाठी नाक आणि ओठांची सर्जरी केल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.

'मंत्रा मीडिया'ला दिलेल्या मुलाखतीत क्रिस्टल तिच्या सर्जरीच्या चर्चांवर मोकळेफणे व्यक्त झाली. "मी खरं सांगायचं झालं तर चेहऱ्यावर एकसुद्धा सर्जरी केलेली नाही. मी एका डॉक्टरकडे गेले होते. माझे काही फिचर्स आणखी उत्तम दिसावेत म्हणून मी काही गोष्टी करून घेतल्या", असं तिने सांगितलं.

याविषयी ती पुढे म्हणाली, "यात चुकीचं काय आहे. जसं केस पांढरे झाल्यावर तुम्ही ते कलर करता. तसंच मी स्वत:ला आणखी प्रेझेंटेबल बनवण्यासाठी माझा लूक आधीपेक्षा चांगला करून घेतला. यात मला काहीच चुकीचं वाटत नाही."

प्लास्टिक सर्जरीवरून सतत ट्रोल करणाऱ्यांना क्रिस्टलने हे उत्तर दिलं आहे. त्याचसोबत तिने ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली आहे. कोण काय बोलतं, याने मला फरक पडत नाही, असं ती म्हणाली.