प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश दिल्याने ट्रोल, आता मुस्लीम अभिनेत्रीने विधीवत केलं लक्ष्मीपूजन; चाहते म्हणाले, ‘धर्माच्या ठेकेदारांकडे..’

दिया मिर्झाच्या प्रदूषणमुक्त दिवाळीच्या आवाहनावरून सुरू झालेला वाद आता वेगळ्याच वळणावर गेला होता. मात्र, दिवाळी साजरी करण्याचा आनंद आणि पर्यावरणाची काळजी या दोन्ही गोष्टी एकत्र असू शकतात, अशी चर्चा तिच्या पोस्टमुळे पुन्हा सुरू झाली आहे.

| Updated on: Nov 09, 2026 | 10:09 AM
1 / 5
अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. फटाके न फोडता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केल्याने तिला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. तिच्या धार्मिक ओळखीवरूनही काही जणांनी आक्षेप घेतला होता.

अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. फटाके न फोडता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केल्याने तिला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. तिच्या धार्मिक ओळखीवरूनही काही जणांनी आक्षेप घेतला होता.

2 / 5

या वादानंतर आता दिया मिर्झाने विधीवत लक्ष्मीपूजन केलं असून, या पूजेचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून, अनेक चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.

3 / 5

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत अभिनेत्री दिया मिर्झासह माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचाही सहभाग होता. दिया मिर्झाने व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण टाळण्याचं आवाहन केलं होतं.

4 / 5

मात्र, तिच्या या व्हिडीओवरून वाद निर्माण झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी तिच्या मोहिमेतील सहभागावर आक्षेप घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवला. या प्रकरणामुळे राजकीय आणि मनोरंजनविश्वातही चर्चा रंगली होती. यावर प्रतिक्रिया देताना दिया मिर्झाने आपण या मोहिमेसाठी कोणतेही पैसे घेतले नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हा व्हिडीओ केल्याचंही तिने सांगितलं होतं.

5 / 5

या संपूर्ण वादानंतर आता दियाने दिवाळी सेलिब्रेशनचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या दिवाळी उत्सवाची सुंदर झलक पाहायला मिळते. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करत तिने लक्ष्मीपूजन केल्याचंही या पोस्टमधून दिसत आहे. दियाच्या या पोस्टवर कमेंट करताना अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 'तू कोणत्याही धर्माची असलीस तरी तुला प्रत्येक सण साजरा करण्याचा अधिकार आहे', अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी तिला धर्माच्या ठेकेदारांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी तिच्या विचारांचं समर्थन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणं चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us