
जवळपास घरात बटाट्याची भाजी तयार होते. खिचडीसह अनेक पदार्थांमध्ये बटाटे वापरली जातात. मात्र, अनेक लोक बटाटे खाल्ल्याने वजन वाढते म्हणून बटाटे खाणे टाळतात.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना बटाटे खाण्यास प्रचंड आवडते. बटाट्यापासून अनेक पदार्थ तयार केली जातात आणि ती प्रचंड चवदार देखील असतात.

बऱ्याचदा आपण ऐकले असेल की, बटाटे खाल्ल्याने शुगर वाढते. यामुळे बरेच लोक बटाटे खाणे टाळतात. खरोखरच असे होते का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

डॉक्टरांनी स्पष्ट केले की, बटाट्यांमध्ये कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात. जी शरीरात ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात. याच कारणामुळे बटाट्याला उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ मानले जाते.

जर बटाट्यांचे मोठ्या प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केले, तर ते मधुमेहाच्या रुग्णांमधील रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढत नाही.