Holi 2026 : अफगाणिस्तानातील हिंदू होळी साजरी करू शकतात का? तालिबानचा नेमका नियम काय?

अफगाणिस्तान हे मुस्लीम राष्ट्र आहे. त्यामुळे या देशात हिंदूंचे सण साजरे केले जातात असा प्रश्न विचारला जातो. आता होली सण जवळ आलेला आहे. त्यामुळे तेथील हिंदूंना होळी हा सण साजरा करता येईल का ते जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 23, 2026 | 9:42 PM
1 / 5
होळी हा असा सण आहे, जो संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्वत्र रंगांची उधळण केली जाते. आता तर फक्त भारतच नव्हे तर अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये होळी हा सण साजरा केला जातो.

होळी हा असा सण आहे, जो संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्वत्र रंगांची उधळण केली जाते. आता तर फक्त भारतच नव्हे तर अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये होळी हा सण साजरा केला जातो.

2 / 5

अफगाणिस्तान हे एक मुस्लीम राष्ट्र आहे. त्या देशातही हिंदू लोकसंख्या आहे. त्यामुळे त्या देशात होळी हा सण साजरा केला जातो का? हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊ या....

3 / 5

अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार आहे. या सरकारमध्ये तेथील हिंदू आणि शीख समुदायाला होळी हा सण सार्वजनिक रितीने साजरा करण्याची मुभा नाही. मोठी गर्दी, रस्त्यावर उत्सव किंवा रंगांची सार्वजनिकरित्या उधळण यावर तेथे पूर्णपणे बंदी आहे.

4 / 5

या देशात होळी हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी आहे. गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानमध्ये हिंदूंची संख्या सातत्याने कमी झालेली आहे. 1970 च्या दशकात येथे 2.8 लाख हिंदू होते, असे सांगितले जाते.

5 / 5

अफगाणिस्तानातील संघर्ष, अल्पसंख्याकांची असुरक्षितता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता तेथील हिंदूंची लोकसंख्या खूपच कमी झालेली आहे. 2024-25 या सालापर्यंत तिथे हिंदूंची फक्त 100 कुटुंबे असल्याचे सांगितले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us