
नाना पाटेकर यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मात्र, काही वर्षांपासून सतत नाना पाटेकर यांच्यावर 'मी टू'चे करण्यात आले. नाना पाटेकर एक जबरदस्त आणि धमाकेदार कलाकार हे नक्कीच आहेत.

डिंपल कपाडिया हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. मुळात म्हणजे डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे.

डिंपल कपाडिया हिने म्हटले की, एक कलाकार म्हणून नाना पाटेकर जबरदस्त नक्कीच आहेत. मी त्यांची मोठी चाहती देखील आहे. मात्र, मी त्यांचा दुसरा एक चेहरा बघितला आहे, जो खूप जास्त खराब आहे.

डिंपल कपाडिया पुढे म्हणाली की, नाना पाटेकर यांचा स्वभाव हा खूप जास्त विचित्र आहे. मात्र, त्यांनी कधीच माझ्यासोबत चुकीचे नक्कीच वागले नाहीत. पण एक वेगळा स्वभाव त्यांचा आहे.

डिंपल कपाडिया म्हणाली, त्यांच्या अभिनयाला अजिबात चॅलेंज नक्कीच नाहीये. मात्र, त्यांच्या अभिनयासाठी त्यांना सात खून माप आहेत. सर्व काही माप आहे त्यांना फक्त त्यांच्या अभिनयामुळे.