
फळं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.प्रत्येक फळाचं आपल्या आरोग्यासाठी काहीना काही उपयोग नक्कीच होतो. काही लोकांची दिवसाची सुरुवातही फळांपासून होते.

सगळीच फळं आपल्याला भरपूर फायदा देतात. त्यातील एक महत्त्वाचं फळ म्हणजे पेरू. कारण पेरू जितका चविष्ट आहे तितकाच तो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, बी६ आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला असंख्य फायदे देतात.

पेरूमध्ये संत्र्यांपेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असते, जे हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांपासून तुमचे संरक्षण होते.

पेरूमधील पोटॅशियम आणि फायबर हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. ते रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजेच त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

पेरू हा फायबरचा एक उत्तम स्रोत मानला जातो. तो पचन सुधारण्यास मदत करतो. बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो.