
करीना कपूर खान हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. करीना कपूर हिने 2000 मध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली. तिने काही फ्लाॅप आणि हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

बॉबी देओल याची पत्नी तान्या देओल हिने चित्रपटाच्या सेटवर थेट करीना कपूर हिच्या कानाखाली जाळ काढला होता. यानंतर सेटवर काही वेळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले.

यावेळी सेटवर बॉबी देओल हा देखील उपस्थित होता. 2001 मध्ये रिलीज झालेला चित्रपट अजनबी चित्रपटाच्या सेटवर हा किस्सा घडला. यावेळी करीना कपूर हिची आई देखील सेटवर होती.

करीना कपूर ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असते. करीना कपूर हिने सैफ अली खान याला डेट करण्याच्या अगोदर शाहिद कपूर याला डेट केले आहे.

करीना कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ देखील करीना कपूर ही शेअर करते.