
दिव्या तंवर यांनी वयाच्या 21 व्या यूपीएससी क्रॅक केली. 438 रँक मिळाली. त्यानंतर त्या आयपीएस झाल्या. परंतु त्यांचे लक्ष्य आयएएस होते. मग वयाच्या 23 व्या वर्षी दुसऱ्यांदा यूपीएससी क्रॅक करुन आयएएस झाल्या. त्यावेळी त्यांना 105 रँक मिळाली.

दिव्या खूप लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याचे परिस्थिती कमालीची बदलली. शाळेत असताना सब डिव्हिजनल मजिस्ट्रेट त्यांच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आले. त्यानंतर दिव्या यांनी आपण त्या पदापर्यंत जाण्याचा निश्चय केला.

शाळेच्या दिवसांत सब डिव्हिजनल मजिस्ट्रेट प्रमुख पाहून म्हणून आल्यावर त्यांच्या भाषणाचा प्रभाव दिव्या यांच्यावर झाला. त्यानंतर त्यांची निवड नवोदय विद्यालयात झाली. मग महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्यांना यूपीएससीची माहिती मिळाली.

दिव्या यांनी यूपीएससीच्या तयारीचा अनुभव सांगताना म्हटले, मनावर खूप दडपण होते. परंतु निश्चिय ठाम होता. नकारात्मक विचार मनात येऊ दिले नाहीत. यूपीएससीच्या तयारीत त्याच्या आईपासून त्याच्या भावंडांपर्यंत सर्वांनी खूप खेळ केला.

दिव्या तंवर यांनी यूपीएससीसाठी एकही क्लास लावला नाही. त्यांनी टॉपर्सच्या मुलाखती पाहिल्या. परीक्षेच्या तयारीसाठी एनसीईआरटी पुस्तकांची मदत घेतली. मेहनत कधीच व्यर्थ जात नाही, असा त्यांचा विश्वास आहे. त्या म्हणतात, आज नाही तर उद्या तुम्हाला त्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल.