14, 18 की 22 कॅरेट; रोजच्या दागिन्यांसाठी कोणतं सोनं सर्वात भारी?

दिवाळीत सोने खरेदी शुभ मानली जाते, परंतु शुद्धता आणि योग्य कॅरेटची निवड करणे महत्त्वाचे आहे. २४ कॅरेट शुद्ध असले तरी दागिन्यांसाठी २२ कॅरेट उत्तम. रोजच्या वापरासाठी १८ किंवा १४ कॅरेट सोने निवडा.

| Updated on: Oct 16, 2025 | 4:33 PM
1 / 10
भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा येत्या २० ऑक्टोबर २०२५ पासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळीत सोने खरेदी करणे ही अनेक वर्षांची जुनी परंपरा आहे.

2 / 10
दिवाळीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. ज्यामुळे घरात नशीब आणि समृद्धी येते असे मानले जाते. त्यामुळे अनेकजण या दिवशी आवर्जुन आपल्या बजेटनुसार सोन्याच्या वस्तू खरेदी करतात.

3 / 10
सोने खरेदी करताना त्याची शुद्धता आणि कॅरेट तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची किंवा घेतलेले दागिने लवकर तुटण्याची शक्यता असते.

4 / 10
सोन्याची शुद्धता 'कॅरेट' मध्ये मोजली जाते. २४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध १०० टक्के आणि सर्वात महाग असते. मात्र त्याच्या अत्यंत शुद्ध स्वरूपामुळे ते खूप मऊ असते. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनवल्यास ते तुटण्याचा किंवा वाकण्याचा धोका असतो.

5 / 10
त्यामुळे २४ कॅरेटचे दागिने रोजच्या वापरासाठी योग्य नाहीत. तुम्ही गुंतवणुकीसाठी २४ कॅरेटची सोन्याची बिस्किटे किंवा नाणी खरेदी करू शकता. दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोने सर्वात लोकप्रिय आणि पसंतीचे मानले जाते.

6 / 10
२२ कॅरेट सोने शुद्ध, मजबूत आणि टिकाऊ असते. यात अंदाजे ९१.६ टक्के शुद्ध सोने असते, तर उर्वरित धातू (उदा. तांबे, चांदी) मिसळलेले असतात, ज्यामुळे त्याला मजबुती मिळते.

7 / 10
साधारणत: मंगळसूत्र, नेकलेस सेट, बांगड्या आणि विशेषतः लग्नाचे दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोने हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला रोजच्या वापरातील दागिने म्हणजेच अंगठी, कानातले, नाकातली रिंग असे दागिने बनवायचे असतील तर ते टिकाऊ असणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही १८ कॅरेट सोने निवडू शकता.

8 / 10
१८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ७५ टक्के शुद्ध सोने असते आणि उर्वरित २५ टक्के इतर धातू मिसळलेले असतात. हे सोने कठीण असल्यामुळे ते तुटत नाही. तसेच १४ कॅरेट सोन्यात फक्त ५८.५ टक्के शुद्ध सोने असते. परंतु ते अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असते. याचा वापर तुम्ही अंगठी, स्टड्स किंवा लॉकेट बनवण्यासाठी आणि दैनंदिन वापरातील सोनं बनवण्यासाठी करु शकता.

9 / 10
सोने खरेदी करताना प्रत्येक दागिन्यावर असलेला 'हॉलमार्क' (BIS HUID) नेहमी तपासा. तुम्ही खरेदी करत असलेल्या विशिष्ट कॅरेट सोन्याचा आजचा दर तपासा. तसेच या खरेदी केलेल्या वस्तूचे योग्य आणि पक्के बिल घ्या. दागिने खरेदी करताना त्याचे वजन योग्य आहे की नाही, याची खात्री करा.

10 / 10
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us