पितृपक्षात दररोज या 3 गोष्टी करायला विसरु नका… पितृदोषापासून मिळेल मुक्ती…, नका करु दुर्लक्ष

सनातन धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं. या पवित्र दिवसांमध्ये फक्त आपण आपल्या पूर्वजांना पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो. पण पितृपक्षात या तीन गोष्टी करायला कधीच विसरु नका. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी...

| Updated on: Sep 27, 2026 | 2:40 PM
1 / 5
पितृपक्षात काही गोष्टी नियमित केल्या पाहिजे. दररोज घराचा उंबरठा स्वच्छ करून त्यावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडावे. अशी श्रद्धा आहे की, असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते.

पितृपक्षात काही गोष्टी नियमित केल्या पाहिजे. दररोज घराचा उंबरठा स्वच्छ करून त्यावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडावे. अशी श्रद्धा आहे की, असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते.

2 / 5

मान्यतेनुसार, पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पणासोबत काही उपायही केले जातात. पितृपक्षात दररोज हे उपाय केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. हे उपाय पूर्वजांच्या आत्म्यांना संतुष्ट करतात असे देखील मानलं जातं.

3 / 5

वास्तूनुसार, दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. त्यामुळे, दररोज स्नान करून ध्यान केल्यानंतर, सकाळी आणि संध्याकाळी या दिशेला दिवा लावावा. मान्यतेनुसार, दक्षिण दिशेला दिवा लावल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते आणि रोग, दोष व गरिबीपासून मुक्ती मिळू शकते.

4 / 5

पितृपक्षात दररोज आपल्या पूर्वजांच्या प्रतिमेला स्वच्छ करून त्यावर ताज्या फुलांचा हार अर्पण करावा. फुलांचा हार अर्पण करणे शक्य नसल्यास, पूर्वजांच्या प्रतिमेसमोर फक्त काही फुले ठेवता येतात.

5 / 5

मान्यतेनुसार, पितृपक्षात अशा प्रकारे पूर्वजांचे स्मरण आणि पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या पूर्वजांच्या पापांपासून मुक्ती मिळते. (डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us