
जगभरात लाखो लहान-मोठी मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा स्वतःचा इतिहास आहे. या मंदिरांमध्ये मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. मात्र, काही मंदिरांच्या परंपरा इतक्या अनोख्या आहेत की त्या सामान्य माणसाला विचार करायला भाग पाडतात. तुम्ही अशा अनेक मंदिरांबद्दल ऐकले असेल. पण घटस्फोटासाठी प्रसिद्ध असलेले मंदिर तुम्हाला माहीत आहे का? त्याचे नावही बदलून 'डिव्होर्स टेंपल' असे ठेवण्यात आले आहे.

डिव्होर्स टेंपल हे नाव ऐकलं की इथे लोक घटस्फोट घेतात असं वाटतं, पण तसं नाही. या मंदिराचा इतिहास जवळपास 700 वर्षांचा आहे आणि येथे कोणीही घटस्फोट घेत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की जर या मंदिरात घटस्फोट होत नाहीत तर मग या मंदिलारास डिव्होर्स टेंपल असे नाव का दिले गेले? आज आम्ही तुम्हाला त्याचा इतिहास सांगणार आहोत.

हे देशातील एक अनोखे मंदिर आहे. डिव्होर्स टेंपल जपानच्या कानागावा प्रांतात आहे. कानागावा प्रांतातील कामाकुरा शहरात असलेले मत्सुगाओका टोकेई-जी मंदिर डिव्होर्स टेंपल म्हणून ओळखले जाते. हे मंदिर सुमारे 700 वर्षे जुने आहे. या मंदिराचा इतिहास महिलांशी निगडीत आहे. ज्यांना कोणीही नव्हते अशा महिलांना या मंदिरात आश्रय देण्यात आला.

हे मंदिर महिलांसाठी दुसरे घर आहे. तुम्ही विचार करत असाल की लोक घटस्फोट घेण्यासाठी मंदिरात जातात, परंतु तसे अजिबात नाही. या मंदिरात कोणाचा घटस्फोट होत नाही, तर हे मंदिर असहाय महिलांसाठी दुसरे घर आहे. असे म्हणतात की हे मंदिर अशा वेळी बांधले गेले होते जेव्हा महिलांना कोणतेही अधिकार नव्हते. कौटुंबिक हिंसाचार आणि छळाच्या पीडित महिलांना आधार देण्यासाठी हे मंदिर बांधण्यात आले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, जपानी डिव्होर्स टेंपल काकुसन शिदो-नी यांनी बांधले होते. हा काळ असा होता जेव्हा स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते. स्त्रियांनी पुरुषांशी लग्न केले आणि जेव्हा तो पुरुष लग्नाने खुश नसायचा तेव्हा तो स्त्रीला घटस्फोट द्यायचा. अशा परिस्थितीत हे मंदिर या महिलांसाठी आधार ठरले. या मंदिरात काही काळ राहिल्यानंतर महिलांना विवाह संबंध तोडण्याची परवानगी देण्यात आली.